पुरंदर तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेमध्ये अनेक घडामोडी ;तर जितेंद्र कुंजीर यांची पुरंदर तालुका शिक्षक संघटनेतून हकालपट्टी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेतील अलीकडे घडामोडीमुळे शिक्षक संघटनाच्या वर्तुळामध्ये एक प्रकारे खळबळ उडाली असून, पसंतीच्या संचालक मंडळामध्ये शिक्षक संघाचे 9 तर समितीचे 6 संचालक आहेत ,संघाच्या संचालकाच्या टप्प्याटप्प्याने दोन जागा रिक्त झाल्यानंतर, शिक्षक संघाच्या वतीने जितेंद्र कुंजीर व गणपत मेमाणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पूर्व रीत सर्व संचालक लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत, दरम्यान सभापती पद रिक्त झालेले शिक्षक संघाने सर्व सभासदांची बैठक घेऊन, सभापती पदासाठी चंद्रकांत जगताप तर उपसभापती पदासाठी गणपत मेमाणे यांची नावे अधिकृतरित्या निश्चित केली होती मात्र प्रत्यक्ष निवड प्रक्रिया दरम्यान ;जितेंद्र कुंजीर यांनी समिती सदस्यांच्या सूचक व अनुमोदकांच्या मदतीने सभापती पद मिळवले, या निवडीमध्ये शिक्षक संघाच्या अधिकृत उमेदवारांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तातडीची बैठक घेण्यात आली संघटनेच्या विरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जितेंद्र कुंजीर यांची शिक्षक संघातून रीतसर पद्धतीने हाकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, हा निर्णय कार्यकारी मंडळाच्या समितीने घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली, तसेच पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सलग्न असल्याने, संघटनेचे निर्णय सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहेत, त्यानुसार केंद्रप्रमुख संघटना व शिक्षक संघ या दोन्ही स्तरावरून जितेंद्र कुंजीर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजेंद्र जगताप यांनी ही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments