Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील राजुरी येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवास सुरुवात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील राजुरी ता.पुरंदर येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवात सुरुवात रविवार दि. 29 मार्च रोजी रात्री 9:30 वाजता कावडीची सजावट करून, पांडेश्वरकडे प्रस्थान, चैत्रशुद्ध 12शके ते 1948 सोमवार दि. 30 मार्च रोजी भैरवनाथ जोगेश्वरी यांना अभिषेक करून, पोशाख, अलंकार करून, देवाची आरती होणार असून, दुपारी भजनी मंडळ राजुरी करांचे भजन होणार आहे, सायंकाळी महादेव मंदिर येथे धार घालून, कावड मिरवणूक होणार आहे, त्यानंतर महाआरती होणार आहे, दंडवत व शेरनीचा कार्यक्रम पार पडणार आहे,, रात्री आमल घुगऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे, नाथमहाराज व आई जोगेश्वरी यांची पालखी मिरवणूक होणार आहे, आरती होऊन ,पुढील कार्यक्रम छबिने पारंपारिक ढोल, लेझीमचे खेळ होणार आहेत, मंगळवारी दि.31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे, तर कुस्त्यांचे जंगी मैदान आखाडा होणार आहे, राजुरी या ठिकाणी यामध्ये प्रामुख्याने कुस्त्यांचा 75 या पार पडणार आहेत, 69 ते 75 पर्यंत पाच हजार रुपयांची कुस्ती लागणार आहे, 66 ते 68 पर्यंत सात हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 64 ते 65 पर्यंत दहा हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 35 ते 63 पर्यंत 11,000 रुपयाची कुस्ती लागणार आहे, 24 ते 34 पर्यंत 15,000 रुपयाची कुस्ती लागणार आहे ,16 ते 23 पर्यंत 21 हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 13 ते 15 पर्यंत 25 हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 10 ते 12 पर्यंत 30,000 ची कुस्ती लागणार आहे, 9वी कुस्ती 35 हजार रुपये तर आठवी कुस्ती 41 हजार रुपये सौजन्य योगेश पां. भगत, सातवी कुस्ती 51 हजार रुपये सौजन्य विजय रा. भगत व आर्यन स. शिवरकर सहावी कुस्ती ६१ हजार रुपयांचे सौजन्य हनुमंत ज्ञा. भगत व सुधाकर भगत, पाचवी कुस्ती ६५ हजार रुपयांचे उद्धव भा. भगत, सत्यवान चोरघडे, सुधाकर भगत चौथी कुस्ती 75 हजार रुपयांची महेश ह. भगत व प्रमोद सं. भगत ,तिसरी कुस्ती ही गणेश कुंकुले व चंकी कुमार पंजाब यांच्यात होणार आहे, 81 हजार रुपयाची उद्धव भा. भगत व सत्यवान कि. चोरघडे, दुसरी कुस्ती रोहन पवार व जुबेर रशिया यांच्यात होणार आहे, एक लाख, 11 हजार 111 रुपयाची कुस्तीसाठी सौजन्य नंदा ह. भगत व ईर्षा शा. भगत यांच्याकडून होणार आहे. पहिली व शेवटची कुस्ती ही2, 22, 222 ची महेंद्र गायकवाड उप महाराष्ट्र व कुणीव सर्वे सिंचन रशिया वर्ल्ड चॅम्पियन यांच्यातील राजुरी गावचे जशी की, सुरुवात झाली ती असून आत्तापर्यंत कुस्ती शौकिनासाठी मन मुरादे, इच्छा, आकांक्षा, कुस्तीगीर यांचे सांभाळणारे गावचे हरिभाऊ रामचंद्र भगत भैरवनाथ इंडस्ट्रीज व ग्रुप भैरवनाथ वडकी व कृष्णाजी नारायण भगत भैरवनाथ पोल्ट्री फार्म राजुरी यांच्या सौजन्याने राजुरीचा कुस्ती आखाडा दरवर्षी पार पडतो, यासाठी गावातील अनुभवी वासुदेव (अण्णा) बनकर पंच म्हणून व अंकुश (बापू) भगत हरिभक्त परायण यांचा मोलाचा सहभाग आतापर्यंत कुस्तीसाठी लाभलेला आहे, हे सर्व राजुरी करासाठी खूप दानशूर व्यक्तिमत्व असून, हलगी वादक रणवीर हलगी ग्रुप कोल्हापूर ,युटयुब ज्ञानेश्वर आसवले कुस्ती चॅनल पुरंदर पि.टी.सी युटयुब चॅनेल दादा कोलते, कुस्ती निवेदक सागर चौधरी ,अनिकेत कदम, सागर चव्हाण. युट्युब साठी सौजन्य वासुदेव (अण्णा) बनकर व उद्धव भाऊसो भगत यासाठी संभाजी (आबा) चव्हाण ,संजय ज्ञा. भगत, सुधाकर भगत, बाबुराव पां. गायकवाड, पै. आप्पा भांडवलकर, संजय वि. बोरकर ,सागर चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य कुस्ती आखाडा राजुरी साठी लाभते, आखाड्यासाठी सौजन्य दत्तात्रेय अं. भगत वि. का. सोसायटी संचालकतर जोडल्या गेलेल्या कुस्ती मधील एक पहिलवान न आल्यास समोरील पहिलवानास 40% इनाम हा देण्यात येणार आहे, अशी माहिती राजुरी करा कडून ही प्रतिनिधीला माहिती मिळाली.

Post a Comment

0 Comments