Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्ष फार्मसी विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा उत्साहात सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मेळावा दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी भूषविले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सुमित मुसळे आणि प्रा. स्मिता देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार तसेच शैक्षणिक प्रमुख डॉ.जयश्री जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.या मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, शिस्त आणि करिअर संधी याबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनीही आपल्या सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. महाविद्यालय आणि पालक यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

Post a Comment

0 Comments