Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी मारहाण प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आस्करवाडी ता. पुरंदर येथील तलावाजवळ मुस्लिम तरुणांना झालेल्या मारहाण प्रकरणी ,सासवड पोलिसांनी कारवाई करीत आठ आरोपींना अटक केली आहे, या सर्वांना आज सासवड न्यायालयामध्ये हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, शुक्रवारी दि. 13 मार्च रोजी सायंकाळी रमजानचा उपवास सोडण्यासाठी बसलेल्या तरुणावर टोलक्याने हल्ला केला होता, या घटनेनंतर कोंढवा येथील नागरिकासह काही सामाजिक संघटनांनी सासवड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते, पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करून, आरोपींना शोधून काढले, निखिल कटके, गणेश कटके, गणेश तळवी, युवराज कटके, सागर कटके, सुनील बोराडे, ऋषिकेश कटके, अजित कटके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments