प्रणय गुंजेची नवोदयमध्ये निवड, ९७.५०% गुणांसह यश सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : खळद (ता. पुरंदर) येथील होतकरू विद्यार्थी प्रणय चंद्रकांत गुंजे याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. या निवड परीक्षेत त्याने ९७.५० टक्के गुण मिळवत पुणे जिल्ह्यात १६ वा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धात्मक परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील सुमारे १८,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कठीण स्पर्धेत प्रणयने उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.प्रणय हा खळद येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, इयत्ता ५ वी (CBSE पॅटर्न) मध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील चंद्रकांत गुंजे हे सध्या सासवड ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या अनुराधा पोरे तसेच शिक्षिका शीतल खैरे यांनी प्रणयला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.प्रणयच्या या यशामुळे खळद गावासह परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments