ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा खानवडी येथील उद्घाटन शुभारंभ; महात्मा ज्योतिराम फुले यांच्या 200 वा जन्म शताब्दी वर्षाचा शुभारंभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ज्योती सावित्रीबाई जिल्हा परिषद शाळा खानवडी येथील उद्घाटन शुभारंभ महात्मा ज्योतिराम फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ खानवडी ता. पुरंदर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालक मंत्री सुनेत्रा पवार यासोबत होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलताना म्हणाल्या की, ज्योती सावित्रीच्या रूपातूनच हे खानवडी येथे रूप असे निर्माण झालेले आहे, याला आंतरराष्ट्रीय दर्जेची शाळा उभारण्याचा अजित पवारांचा मानस होता ,याचे दादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, दादा आता असायला पाहिजे होते, त्यांना खूप आनंद झाला असता ,माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा दादांनी एक प्रकारे समाजात घडवून आणला आहे, ही वास्तू नसून महिलाशक्ती स्थळ आहे, असा सुद्धा त्यांनी उल्लेख केला, १००० शाळांमध्ये असे उपक्रम राबवण्याचे शासनाचे धोरण आहे, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले. वीरधवल जगदाळे जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे, जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, शासनाच्या विविध उपक्रमातून जो योजना चालू आहेत, त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून, फ्रान्स जर्मनीचे भाषा बोलून दाखवली त्या उपक्रमाचा 100 शाळांमधून उद्घाटन करण्यात आलेले आहे, त्या उत्कृष्ट असा आनंद आम्हाला त्याबद्दल आहे ,1000 केंद्र माणूस संशोधन साधन उभारण्याचा काम करत असून, जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहून जो समाज घडविण्याचा प्रयोग केला त्याला महत्त्व आहे ,महात्मा ज्योतिराव फुले यांनी चांगलीच बाजारपेठ उभी करून, त्याची जागृती निर्माण केलेली आहे ,शेतकरी यावर लागणारे कर या संदर्भात चर्चा करून, कंपनी ही मोठी होती, बांधकामाची योजना साकारून समाज घडविण्याचा फुलेंनी जे कार्य केलेले आहे, त्याचे फळ हे समाजामध्ये दिसत आहे, पुणे जिल्ह्यातील विविध उद्योजकता फुलेंनी निर्माण केलेली आहे, नगर विकासाचे एक प्रकारचे मॉडेल बनवून दाखवले आहे, शेअर बाजार चालू केला, जोपर्यंत शिक्षण घेत नाही ,तोपर्यंत शिक्षण घेणे गरजेचे असून ,भिड्यावाड्याची पहिली शाळा पुणे येथे महात्मा फुले म्हणजे पहिले महात्मा ज्योतिराम फुले होय, विद्धे विनामती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गती विना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले क्रांतीसुर्य थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराम फुले यांनी या प्रकारचे कार्य केले आहे ,असे फडणवीस यांनी सांगितले. खानवडी येथे संदीप पवार कृषी विभाग व ऋतुजा इंगोले आजच्या कार्यक्रमांमध्ये खानवडी येथील कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पाहायला मिळाला ,तर जिल्हा परिषद पुणे यांनी खानवडी येथील ग्रामपंचायत याना सुद्धा अजिबात विचारात घेतले नाही, मनमानी कारभार केलेला आहे ,अशा कार्यक्रमाला कोणतेही गालबोट नको, म्हणून सर्व समाजामधून सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत गप्प होते, विमानतळाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी व मंत्री याकडून कोणत्याही प्रकारचा विमानतळाचा कोणताही उल्लेख झालेला नाही, शेतकऱ्यांसाठी ही मोठी जमेची बाजू ठरलेली आहे. यावेळी सुप्रिया सुळे खासदार, चंद्रकांत पाटील मंत्री, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री, आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री, दत्तात्रय भरणे कृषी मंत्री, अतुल सावे मंत्री, योगेश कदम मंत्री, योगेश टिळेकर, राहुल कुल, शंकर मांडेकर, बापू पठारे आमदार, शेखर वढणे अध्यक्ष संजय जगताप माजी आमदार, विवेक वळसे पाटील उपाध्यक्ष पुणे, जितेंद्र बडेकर समाज कल्याण सभापती, दिपाली हुलावले महिला बालकल्याण सभापती, अजय इंगळे जिल्हा परिषद सदस्य, अमित झेंडे सभापती पंचायत समिती पुरंदर, माणिक निंबाळकर पंचायत समिती सदस्य, स्वप्नाली होले प्रशासक सरपंच खानवडी, जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे, वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर, संदीपसिंग गिल ग्रामीण अधीक्षक पोलीस खाते पुणे, पंचक्रोशीतील म्हणजेच विमानतळ बाधित गावातील सात गावातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, सरपंच ,उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका ,अधिकारी कमॅचारी, पत्रकार बहुसंख्येने आधी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments