पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये १ मे रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) : आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने यावर्षीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सासवड येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याचे यंदा विसावे वर्ष असून, गेल्या दोन दशकांपासून सर्व जाती-धर्मातील गरजू कुटुंबांसाठी ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ६०० ते ७०० विवाह लावून देण्यात आले आहेत. या विवाहांमधून अनेक कुटुंबांचे संसार सुखाने सुरू असून, समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे.या भव्य सोहळ्यास महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार पार्थ पवार उपस्थित राहणार आहेत.सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नववधू-वरांना मोफत कपडे, बूट, भव्य मिरवणूक, संसारोपयोगी साहित्य तसेच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा ज्ञानोबा जगताप, अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, कार्याध्यक्ष अभिषेक जगताप, उपाध्यक्ष विकास जगताप, सचिव राहुल इनामके, सहसचिव सुनील बापू जगताप, मार्गदर्शक हेमंत भोंगळे तसेच पदाधिकारी अभिजीत बारवकर, गिरीश कर्नावट, उमेश भैय्या जगताप, सचिन जगताप, गणेश मोरे, बळीराम सोनवणे यांनी अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी आदर्श क्रांती संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments