पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 निमित्त विशाल नरवाडे (भा. प्र.से )त्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माननीय राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडील 13 जानेवारी 2026 रोजी च्या अधिसूचनेनुसार, त्या अनुसंघानुसार पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या चार गटांमध्ये व पंचायत समितीच्या आठ गणासाठी निवडणूक होणार आहे, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी विशाल नरवाडे( भा. प्र.सो) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, मा. निवडणूक निरीक्षक, यानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे पुरंदर नवीन प्रशासकीय इमारत सासवड येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी यांची बैठक घेतली,सदर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निष्पक्षपातीपणे पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडल्या, जाव्यात या अनुषंगाने सर्व नियुक्त नोडल अधिकारी यांना मार्गदर्शन व योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या सर्व मतदान केंद्राचा आढावा घेऊन, सदर मतदान केंद्रावर लाईट, पाणी, टॉयलेट, बैठक व्यवस्था, इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला सासवड तालुका पुरंदर येथे निवडणूक निरीक्षक यांचे कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, निवडणुकीच्या कालावधीमध्ये नागरिकांच्या काही अडीअडचणी शंका तक्रारी असल्यास, त्याबाबत निवडणूक निरीक्षक यांचे कक्षात दाखल करू शकता, सदर ठिकाणी नियुक्ती कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असतील, सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शक सूचनानुसार, पारदर्शकपणे निवडणुकीचे कामकाज पार पाडण्याच्या सूचना देऊन बैठक संपन्न झाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments