सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे पर्यावरण संवर्धनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न सासवड पतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागातर्फे पर्यावरण संवर्धन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटन व स्वागताने झाली. एनएसएस कार्यक्रम अधिकारी सुमित मुसळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.पहिल्या सत्रात बायोस्फिअर्स, पुणेचे अध्यक्ष डॉ. सचिन पुनेकर यांनी पर्यावरण संवर्धनावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे ग्रुप सीनियर मॅनेजर गणेशकुमार झेंडे यांनी औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरण व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा धुमाळ यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. फोटो : सासवड (ता.पुरंदर ) येथे डॉ. सचिन पुणेकर ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments