सुपे खुर्द. (ता. पुरंदर) येथे सेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, सासवड. राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्नसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे. जिल्हा. शिक्षण मंडळाचे सेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने(एन. एस. एस) अंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ सुपे (खुर्द), ता. पुरंदर, जि.पुणे येथे १९ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण होत्या. त्यांनी उपस्थित एन .एस.एस.स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासात युवकांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उप प्राचार्या डॉ. स्मिता पवार मॅडम तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी जनहितार्थ हॉस्पिटलचे डॉ. सुभाष शिवतरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी एन.एस.एस.स्वयंसेवकांना विशेष हिवाळी शिबिरासाठी शुभेच्छा देत समाज सेवेमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुरेखा कणिफनाथ जगताप यांनी देखील कार्यक्रमास उपस्थित राहून स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष जाधव, श्री. कैलास जगताप (मा. चेअरमन), श्री. महेश राऊत (अध्यक्ष, ग्राहक हक्क संघर्ष समिती), श्री. सतीश काटकर (उद्योजक), श्री. नवनाथ तानवडे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), श्री. राजेंद्र जगताप (माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), सौ. संगीता हिंगणे (मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा), सारिकाताई शिवणकर (उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) तसेच अभिराज चव्हाण (उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा) यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित मुसळे आणि प्रा. प्रशांत गायकवाड यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामविकास, आरोग्य जनजागृती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात येणार असून एन.एस.एस. स्वयंसेवक समाजासाठी योगदान देणार आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments