सासवड येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयात ‘निर्भया कन्या अभियान’ उत्साहात संपन्न सासवड पतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड येथे निर्भय कन्या अभियान कार्यक्रम विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अर्थसहाय्याने घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून महाविद्यालयात उत्साहात पार पडला.त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांचे सक्षमीकरण, आत्मविश्वास व सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.पहिल्या सत्रात डॉ. संध्या खळदकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, चिंतामणी हॉस्पिटल, सासवड यांनी “महिलांचे आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच जीवनशैलीतील सकारात्मक बदल यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.दुसऱ्या सत्रात ॲड. उषा विजय लोमटे, जिल्हा व सत्र न्यायालय, सासवड यांनी “महिलांचे हक्क, कायदे व नियम” या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया व कायदेशीर अधिकार यांची माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना दिली.दुपारनंतर आयोजित तिसऱ्या सत्रात नमिता संतोष कामथे, क्षत्रिय तायक्वांदो अकॅडमी, सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वसंरक्षण प्रशिक्षण (तायक्वांदो) प्रात्यक्षिकांसह घेण्यात आले. या सत्राला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचा संपूर्ण समन्वय डॉ. प्रशांत खाडे तसेच प्रा. विशाखा गायकवाड (पॉलिटेक्निक विभागप्रमुख) यांनी प्रभावीपणे साधला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलात अत्तार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिल्पा कामथे यांनी मानले. हा उपक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास, आरोग्यविषयक जागरूकता व कायदेशीर साक्षरता वाढविण्यास उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments