पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडी बिनविरोध सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडी शुक्रवारी दि. 23 रोजी नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत बिनविरोध करण्यात आल्या, नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती व इतर समित्यांचे सभापती यांचे पदसिद्ध सदस्य असतात, त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांची निवड झाली. सत्ताधारी भाजपच्या वतीने गटनेते अजित जगताप आणि शिवसेनेकडून विरोधी गटनेते मंदार गिरमे यांनी विषय समित्यांच्या सदस्यांची नावे पिठासिन अधिकाऱ्याकडे सादर केली, पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी काम पाहिले, माजी आमदार संजय जगताप यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला, विषय समिती पदाधिकारी पुढील प्रमाणे: महिला व बालकल्याण समिती सभापती प्रियंका साके जगताप, उपसभापती लीना सौरभ वढणे, सदस्य स्मिता सुहास जगताप, रत्ना अमोल म्हेत्रे, दिपाली अक्षराज जगताप, पाणीपुरवठा व जल संधारण समिती: सभापती न्यानेश्वर गिरमे, सदस्य शितल प्रवीण भोंडे, प्रदीप राऊत, प्रितम म्हेत्रे, सचिन भोंडे. बांधकाम समिती सभापती: ज्ञानेश्वर जगताप, सदस्य अर्चना चंद्रशेखर जगताप, प्रदीप राऊत, वैभव टकले, बाळासो भिंताडे, आरोग्य समिती सभापती: राजन जगताप, सदस्य स्मिता उमेश जगताप, मयूर चौखंडे ,माधुरी तेजस राऊत, हेमलता मिलिंद इनामके. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती तथा उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, सदस्य सोपान रणपिसे, स्मिता उमेश जगताप, मंदार गिरमे, शिल्पा संदीप जगताप, स्थायी समिती सभापती: तथा नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप, सदस्य मनोर जगताप, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, ज्ञानेश्वर जगताप, राजन जगताप,अजित जगताप.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments