चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; तर तिघांवर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील विवाहितेला चारित्र्याचा संशय, तसेच लग्नात मानपान दिल्याच्या कारणावरून, सातत्याने होणारी मारहाण व त्रासाला कंटाळून, सासरकडील पती, सासू,व नणंद यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे, या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती सासवड पोलिसांनी दिली असून, भाग्यश्री हितेश पारगे सध्या राहणार बोपगाव यांनी सासरच्या होणाऱ्या छळाला, कंटाळून, पती हितेश शिवाजी पारगे, सासू इदूमती शिवाजी पारगे, राहणार डोणजे हवेली नणंद सिद्धी गणेश गोसावी राहणार सिंहगड रोड पुणे यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून, दिनांक 18 जून 2024 ते मे 2025 अखेर वारंवार चामड्याच्या पट्ट्याने, मारहाण करणे, माहेरकडील माणसांना वारंवार जीवे मारण्याची धमकी देणे, सोन्याची अंगठी, चांदीच्या भांड्याची मागणी करणे, चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक मानसिक छळ करणे, मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून घेऊन, शारीरिक मानसिक छल करणे,मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून घेऊन, शारीरिक गंभीर दुखापत केल्याबद्दल सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम पुढील तपास करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments