वाघीरे महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन कट्टा उपक्रम उत्साहात संपन्न सासवड पतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात पुरंदर कलामंच व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दि. १९/१/२०२६ रोजी ‘वाचन कट्टा’ या उपक्रमा अंतर्गत अभिवाचन हा उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचेप्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, पुरंदर कला मंचचे प्रमुख संजय काटकर अभिवाचक प्रा. मधुसूदन जगताप, प्रा. संतोष तांबे, डॉ. किरण गाढवे , कवी देवा भालेराव, कवी शुभानन अरुण चिंचकर, तसेच पुरंदर कलामंच चे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्र, नाटक,कथा, कादंबरी, कविता व आत्मचरित्र या विविध साहित्य प्रकारांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काटकर यांनी केले. याप्रसंगी बोलताना पुरंदर कलामंच च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सांगून समाज उपयोगी साहित्यिक उपक्रमाचे आयोजन करून समाज आणि साहित्य यांचा समन्वय साधण्यासाठी पुरंदर कलामंच महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. वाढत्या माहिती तंत्रज्ञान च्या या जगात वाचकांना वाचकाशी जोडण्याचे काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीस देवा भालेराव यांनी ‘पत्रास कारण की’ या पत्राने अभिवाचन कार्यक्रमाचीसुरुवात केली. तसेच’ नटसम्राट’ या वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटकातील ‘टू बी ऑर नॉटटू बी’ या स्वागताचे अभिवाचन करून विद्यार्थ्यांना या साहित्य प्रकाराचा परिचय करून दिला. प्रा. मधुसूदन जगताप यांनी ‘एकटा जीव’ या दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रातील परिच्छेदाचे वाचन केले. या आत्मचरित्रात दादा कोंडके हे लिहितात, पद, पैसा, प्रसिद्धी या सगळ्यांपेक्षाही रक्ताच्या नात्याचे जीवनात अनन्य साधारण महत्व अधोरेखित करतात. तर प्रा. संतोष तांबे यांनी ‘मृत्युंजय’ कादंबरीतील उताऱ्याचे वाचन करून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे बदल हे माणसाने स्वीकारून जीवन आनंदी जगण्याचे महत्त्व आपल्या आशयातून स्पष्ट करतात. आत्मचरित्र कादंबरीतील आशयपूर्ण उताऱ्यांच्या वाचनातून जीवनमूल्ये, सामाजिकजाणीव व प्रेरणादायी अनुभव उलगडले गेले. डॉ. किरण गाढवे यांनी शुभमंगल सावधान या संजय कळमकर यांच्या कथेतून ‘लग्न’ या संस्थेविषयाचे भाष्य केले. . तर अरुण चिंचकर (कवी शुभानन )यांनी कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला भावनिक व कलात्मक रंग प्राप्त करून दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, अभिव्यक्ती कौशल्य, साहित्याची जाण व आत्मविश्वास वाढीस लागला. मराठी साहित्याची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध परंपरा यांची ओळख करून देणे. हा याकार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय प्राचार्य डॉ. पंडित शेळके आणि उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील डॉ. सुवर्णा खोडदे (मराठी विभाग प्रमुख) डॉ. किरण गाढवे, डॉ. नूतन लोणकर व हेमंत ताकवले, मोहन बागडे निलेश शिंदे कवी अनिल कदम आणि पुरंदर कला मंचाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे क्षण चित्र रूपाने जतन करण्याचे काम संतोष लोणकर यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments