पुरंदर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व आम आदमी पक्षाची युती; एकत्रितपणे लढणार निवडणूक सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष आणि आम आदमी पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे.या युतीची अधिकृत घोषणा करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश ढमाळ आणि आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली. आम आदमी पक्षाकडून माळशिरस जिल्हा परिषद गटासाठी शहाजी कोलते, माळशिरस गणासाठी संदीप चौंडकर तर बेलसर गणासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून अमोल बनकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या निरा–कोळविहीर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सीमा निलेश भुजबळ यांना आम आदमी पक्षाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार या दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे.यावेळी बोलताना मंगेश ढमाळ यांनी सांगितले की, शेतकरी, कामगार, महिला, युवक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व जनहितकारी कारभार करण्यासाठी ही एकजूट करण्यात आली आहे. विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.“लढा जनतेचा – विजय निश्चित” असा नारा देत प्रहार जनशक्ती पक्ष व आम आदमी पक्षाची ही युती पुरंदर तालुक्यात निर्णायक ठरेल, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments