पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सामान्य जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद; बजाज पुणे ग्रँड टूर चा नवा असा ऐतिहासिक जागतिक चेहरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक अशा सांस्कृतिक व निसर्ग संपन्न अशा वातावरणामधील जागतिक पातळीवर दर्शन घडवणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकलींग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा आज मोठ्या उत्साहात व दिमागदार पद्धतीने प्रारंभ झाला, सासवड नगर परिषदेच्या समोर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनेत्राताई पवार, आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून ,या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी, सासवडचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, गणेश बिरादार पोलीस अधिकारी बारामती विभाग, दीपक वाकचौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले की, या स्पर्धेचे आयोजन करताना ते एक स्वप्न वाटत होते, परंतु प्रत्यक्षात उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे हे भव्य असे आयोजन करण्यात आले असून, सासवडाचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे पुण्याचे नाव हे जगभर पोचलेले असून, सायकलींच्या इतिहासामध्ये पुण्याची ओळख व पुरंदरची ओळख ही चांगल्या ठळक अक्षरांमध्ये नोंद झालेली असून, विविध उपक्रम साध्य करून, सासवडकरांनी उत्स्फूर्त असा आनंद सायकलपटूंना देऊन, मिळत आहे ,यामुळे पुण्याचा नाव लौकिक वाढवून, एक विकासासाठी गती मिळत आहे, असा विश्वास व्यक्त करत, त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. ग्रामीण आणि डोंगराळ भागातील या स्पर्धेला प्रतिसाद देऊन, दुपारी साडेबारा वाजता सुरू हा तिसरा टप्पा झालेला, एकूण 134 किलोमीटरचा लांब असा पल्ला असून, सासवड, सुपा, पानवडी, कालदरी, माहूर, मांढर, परिंचे, वाल्हे, पिसुर्डी ,निरा, येथून पुढे सायकलपट्टूंनी आपले देश ,विदेशातील नामवंत सायकलपटूना या मार्गावर आपली ताकद, तंत्र आणि सहन शक्तीचे दर्शन घडवले. ग्रामीण भाग व तसेच घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती, सायकल पटूंना जल्लोषात, प्रोत्साहन दिले .युवकांचा सहस्रता उत्सव ,भारत माता की जय आणि "जय भवानी जय शिवराय" अशा घोषणांनी संपूर्ण मार्ग या ठिकाणी भारावून गेला होता, काही ठिकाणी हलगी, ढोल, ताशा ,लेझीम स्पर्धकांच्या गजरामुळे स्पर्धेला लोकस्वाचे स्वरूप चांगले प्राप्त झाले होते. स्थानिक महिला व युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक यांनी पुष्पवृष्टी करून, सायकलपटूंचे स्वागत केले ,तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची सेल्फी घेण्यासाठी तरुणांमध्ये विशेष अशी उत्सुकता दिसून आली.पुरंदरकरांच्या आपुलकीने आणि आदर तितक्यामुळे अनेक परदेशी सायकलपट्टू भारावून गेल्यामुळे, त्यांना चांगले उत्सुकता निर्माण झाली होती, या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा पोलीस बंदोबस्त उत्तम ठेवला होता.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments