Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदरला गटात 37; तर गणासाठी 82 अर्ज दाखल; तर प्रामुख्याने माळशिरस बेलसर गटात हाय व्होल्टेज लढत पाच पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 37 अर्ज तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 82 असे 119 अर्ज दाखल झाले, नवीन प्रशासकीय इमारत येथून अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद व गर्दी दिसून आली. पुरंदर तालुक्यामध्ये भाजप स्वतंत्र, शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गट एकत्र येऊन राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा, इंडियन नॅशनल काँग्रेस, आम आदमी पार्टी ,अपश असे सर्वपक्षीय एकत्र येऊन फॉर्म भरण्यात आले. यामधील बेलसर मालशिरस गटात 51मध्ये 11 माळशिरस गण क्रमांक 101 मध्ये 18 बेलसर गणात 102मध्ये 11 वीर भिवडी गट क्रमांक 52 मध्ये 15, वीर गण क्रमांक 104 मध्ये 9 भिवडी गण क्रमांक 103 मध्ये 7, निरा शिव तक्रार गट क्रमांक 53 मध्ये 10, निरा शिव तक्रार गण क्रमांक 106 मध्ये 9 कोलविहीरे गण 105 मध्ये क्रमांक 105 मध्ये 15, दिवे गराडे गट क्रमांक 50 मध्ये 1 गराडे गण क्रमांक 99 मध्ये 5 दिवे गण क्रमांक 100 मध्ये 8 पुरंदर तालुक्यातील सर्वात जास्त अर्ज जिल्हा परिषद गट क्रमांक मध्ये वीर-भीवडी गट क्रमांक 52 मध्ये 15 अर्ज, तर पंचायत समिती गण क्रमांक मध्ये माळशिरस गण क्रमांक 101 मध्ये 18 अर्ज जमा झालेत, आजची बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी गटामध्ये 37 अर्ज जमा तर गणामध्ये 82 अर्ज जमा असे एकूण 119 अर्ज आज जमा झाले आहेत, पुरंदर तालुक्यातिल निवडणुकीची चित्र पाहिले असता, बेलसर माळशिरस गटातील निवडणूक ही पंचरंगी होणार असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे, व चुरशीची निवडणूक ही होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments