Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील महायुतीचा अध्याय संपत आला भाजपची स्वबळावर जोरदार अशी खेळी असून, तगडे उमेदवार दिले; तर प्रामुख्याने माळशिरस बेलसर गटात हाय व्होल्टेज लढत पाच पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमी माजी आमदार संजय जगताप यांनी शिवसेनेचे युतीचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर, भाजप शिवसेना युती फिसकटल्याचे स्पष्ट झाले आहे ,भाजपने सर्व प्रस्ताव फेटाळत स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असून, ऐनवेळी काही दिगज्याचे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश करून, उमेदवारी मिळवल्याने, भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात पुरंदर तालुक्यात वाढलेली आहे, चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणासाठी सक्षम उमेदवारांची घोषणा झाल्याने, पुरंदर मधील निवडणूक प्रचाराला प्रचंड असा वेग आला आहे, तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून देखील यावर्षी प्रथम तीन ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून देखील उमेदवार देण्यात आलेले आहेत, काँग्रेसकडून देखील स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले असून, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेली भाजप शिवसेना युतीची चर्चा अखेर निष्प्रभ ठरली असून, शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव माजी आमदार संजय जगताप यांनी स्पष्टपणे नाकारल्यानंतर, राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली, युतीच्या नावाखाली अटी शर्ती मान्य नसल्याने, भाजपने सर्व प्रस्ताव फेटाळले असून, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतलेला आहे, काही प्रतिष्ठित स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे भाजपने एक हत्ती बळ मिळवल्याने, राजकीय वर्तुळात चांगले वलय निर्माण करून, संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची फळी आणि निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन, भाजपने उमेदवार निश्चित केल्याने, विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे तालुक्यातील प्रत्येक गट व गणांमध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, प्रचार रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, यादरम्यान काँग्रेसकडून सुद्धा जिल्हा परिषद साठी दत्ता झुरंगे यांना उमेदवारी दिलेली आहे. भाजपची उमेदवारी यादी पुढील प्रमाणे वीर भिवडी जिल्हा परिषद गट :हरिभाऊ लोळे, वीर गण: सुधीर धुमाळ, निलेश जाधव, भिवडी गण: सायली मनोज शिंदे, संगीता बोरकर, दिवे गराडे गट जिल्हा परिषद गट:दिव्या गंगाराम जगदाळे दिव गण: सुनील कुंजीर, देविदास कामठे गराडे गण :ललिता कटके, रेखा फडतरे बेलसर माळशिरस गट जिल्हा परिषद गट: अजिंक्य कैलास इंगळे बेलसर गण कैलास जगताप, तुषार झुरंगे माळशिरस गण: माऊली यादव निरा कोळविहीरे गट जिल्हा परिषद गट सीमा धायगुडे, निराशिव तक्रार गण: वंदना भोसले, कोळविहीरे गण: सीमा महस्के, शिवसेना एकनाथ शिंदे गट निरा कोळविहीरे गट: भारती अतुल महस्के बेलसर माळशिरस: रमेश इंगळे वीर भिवडी :समीर जाधव दिवे गराडे: ज्योती राजाराम झेडे पंचायत समिती गण रेखा केदारी, कोळविहीरे: शीतल साळुंखे माळशिरस: शरद यादव बेलसर: माणिक निंबाळकर वीर: प्रवीण जगताप भिवडी :सागर मोकाशी दिवे :बाळासाहेब मगर गराडे: सुप्रिया रावडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जिल्हा परिषद गट निरा कोळविहीरे :प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे बेलसर माळशिरस: गौरव विजय कोलते वीर भिवडी: पुष्कराज संजय जाधव दिवे गराडे: रूपाली अमोल झेंडे पंचायत समिती गण निरा: मोनिका स्वप्निल कांबळे कोळ विहिरे: स्मिता संतोष निगडे माळशिरस: अजिंक्य रामदास कड बेलसर: निलेश कृष्णा जगताप वीर: उत्तम महादेव धुमाळ भिवडी: अनुजा अमोल पोमण दिवे: अमित भाऊसो झेंडे गराडे: अर्चना ज्ञानेश्वर कटके प्रहार जनशक्ती पक्ष बेलसर जिल्हा परिषद गट: बेलसर गण :अमोल अरविंद बनकर निरा कोळविहीरे सीमा निलेश भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बेलसर मालशिरस: अमोल कामठे बेलसर गण: योगेश कामठे माळशिरस बेलसर गटात हाय व्होल्टेज लढत पाच पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी भाजपकडून अजय इंगळे यांना तर, शिवसेनेकडून रमेश इंगळे यांना उमेदवारी, राष्ट्रवादीची गौरव कोलते यांना उमेदवारी, काँग्रेस पक्षाची दत्ता झुरंगे यांना उमेदवारी, तर शिवसेना उबाठा यांची उमेदवारी अमोल कामठे यांना देण्यात आलेली अधिकृत आहे.

Post a Comment

0 Comments