बेलसर -माळशिरस जिल्हा परिषद गटाचा शिलेदार नक्की कोण होणार? स्थानिक जिल्हा परिषद गटातील अडीअडचणी समजून घेणारे नेतृत्व असायला पाहिजे ! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बेलसर -माळशिरस जिल्हा परिषद गटामध्ये भाजप, शिवसेना (शिदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गटात युती झाल्यामुळे, या ठिकाणी प्रामुख्याने तीन जणांतच खरी लढत होणार आहे, विशेषता या गटांमध्ये अपक्षाची स्थिती मजबूत होऊ शकत नाही, त्यामुळे पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्येच खरी लढत होणार आहे, सामान्य व्यक्तीचे मत असे आहे की, सध्या तरी फक्त या सर्वसाधारण गटांमध्ये प्रामुख्याने बैलगाडा शर्यत, तीर्थयात्रा देवदर्शन, विविध कार्यक्रमाची कर्मणूकता ही या गटांमध्ये खूप जास्त प्रमाणात चाललेली आहे ,परंतु फक्त निवडणूक आल्यावरच, उमेदवारांनी याला रंग दिलेला आहे, बाकी वेळेत कधीही सामान्य व्यक्तींच्या अडीअडचणी वेळी हे फिरकत सुद्धा नाहीत, फक्त निवडणुका आल्या की मगच त्यांना देवदर्शन तीर्थयात्रा, बैलगाडा शर्यत, विविध कार्यक्रमांची उपस्थिती दिसताना दिसत आहे, विमानतळ संदर्भात, रोडचे काम चाललेल्या प्रश्नावर, सामान्य व्यक्तीवर एकदा सुद्धा या उमेदवारांनी मदत केली नाही, त्यामुळे मतदार योग्य अशी दिशा दाखवून, बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद व पंचायत समितीचा शिलेदार नक्की कोण? हे ठरणार आहे असे एक जाणकार व्यक्तीने मत व्यक्त केले. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, बुलेट ट्रेन अशा विविध प्रश्नांवर या प्रकल्पांना स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र तीव्र विरोध आहे. मनमानी पद्धतीने लादले जाणारे प्रकल्प आहेत, त्यात उमेदवार एकही प्रश्न सामान्य व्यक्तीसाठी बोलत नाहीत, देवदर्शन, बैलगाडा शर्यत करून उमेदवार यांची अपेक्षा ही सामान्य व्यक्तीकडून कदापी पूर्ण होणार नाही, सामान्य व्यक्तीला काय पाहिजे, असते या प्रकल्पावर कोणी आवाज उठवला तर त्यासाठी जनता ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हे यावरून उमेदवारांनी याचा बोध घ्यावा, पुरंदर उपसा सिंचन योजना, जाणाई शिरसाई योजना, पारगाव- माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, शिवरी प्रादेशिक जलजीवन योजना या पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, त्याकडे उमेदवारांचे लक्ष नाही, असे अनेक प्रश्न गंभीर आहेत, या भागातील शेतकरी मतदारासमोर कायमचे प्रश्न उभे आहेत, ते सोडवताना जो उमेदवार सक्षमपणे समस्या सोडवणार तोच खरा शिलेदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीला होणार आहे हे नक्की. भाजप कडून माऊली यादव हे माजी आमदार संजय जगताप यांचे जवळचे कार्यकर्ते असून, माळशिरस गावचे सरपंच आरती यादव या त्यांच्या पत्नी पंचायत समितीला माळशिरस गणातून प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे ,तर आता विद्यमान सरपंच माळशिरस गावच्या आहेत, त्यामुळे भाजपचे एकमेव जिल्हा परिषदसाठी माऊली यादव भाजपचे फक्त उमेदवार असताना ते फिक्स भाजपचे उमेदवार बेलसर -माळशिरस गणासाठी असताना अजय कैलास इंगळे वाळुंज उच्च शिक्षित सिव्हिल इंजिनिअर आहेत भाजप ने एबी foram दिला आहे.या भागातून त्यांना मतदान चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे खंदे समर्थक व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे हे देखील शिवसेना (शिंदे गटाकडून) निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, तर बेलसर गणात इंगळे यांची चांगली पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता झुरंगे की, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांच्यातच नक्की उमेदवारी कोणाला मिळते, हे सांगता येत नाही, त्यामुळे गतवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या गटाचे प्रतिनिधित्व केलेले दत्ता झुरंगे आहेत, प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांना आहे, मतदारसंघांमध्ये त्यांची चांगली पकड आहे .अजित पवार यांचे ते विश्वासू आहेत, तर गौरव कोलते यांना राष्ट्रवादी एबी foram मिळाला आहेच. यांचे वडिलांचा यापूर्वीचा मतदारसंघातील घराघरातील नातेसंबंध, संपर्क व उच्च शिक्षित युवा तरुण गौरव कोलते यांचे युवकांशी असलेले मैत्रीचे संबंध यामुळे, निवडणूक रिंगणात आहेत. परंतु पहिले दिवस राहिलेले नाहीत, बेलसर -माळशिरस साहेबांच्या पहिल्या सांगण्यावरून, कोलतेंना खूप झगडावे लागणार आहे, एवढ्या सहजासहजी विजय प्राप्त करणे सोपे नाही, याची कोलते यांनी आत्ताच दखल घ्यावी, या मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने पुरुष आणि महिला मतदार समसमान आहेत, माळशिरस- बेलसर गटातील जवळपास 27 गावे वाडी वस्तीवर, 45 हजार मतदार या गटात असून पुरुष व महिला समसमान आहेत ,या ठिकाणी सर्वसामान्य जनता ही कुणाला कौल देणार? जिल्हा परिषद व पंचायत समितीला गटातील गणातील कोण शिलेदार ठरणार? हे सध्या तरी तिरंगी लढत प्रमुख पक्षाच्या वतीने होईल ,असे चित्र आहे, शेवटी आज बेलसर माळशिरस गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी मध्ये कोण बाजी मारतोय, हे पाहावे लागणार आहे ,गौरव कोलते की दत्ता झुरंगे मध्ये रसिकेस असून, यामध्ये गौरव कोलते फिक्स आहेत तर दत्ता झुरंगे यांनी काँग्रेसमध्ये असताना, हा जिल्हा परिषदेच्या गटातून प्रतिनिधित्व केले असून, त्यामुळे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे, मतदारसंघांमध्ये दत्ता झुरंगे यांची पकड मजबूत आहे, गौरव कोलते यांना जरी पक्षांनी उमेदवारी दिली तरी, खूप झगडावे लागणार आहे, त्यामुळे बहुतेक आज फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिरंगी लढत ही बेलसर- माळशिरस गणात होऊ शकते, सध्या तरी दत्ता झुरंगे यांचा संपर्क असल्यामुळे, बाजू जमेची आहे, दत्ता झुरंगे यांची असे तरी घडामोडीवर पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये त्यांचे चित्र दिसून येत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments