Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत गटासाठी आज जि.परिषदसाठी 15अर्ज तर पं.समितीसाठी 18 अजॅ दाखल चार दिवसांत 363 अर्जाची विक्री आज अखेर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रांची विक्री सुरू होताच, इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. सोमवारी 19 जानेवारी रोजी दोन होताना अजॅ याचा दाखल करण्यात आले,तर जिल्हा परिषदसाठी आज अखेर 16अजॅ जमा झालेत तर पंचायत समितीसाठी आज अखेर 19 अजॅ जमा झालेत चार दिवसात तब्बल 363 उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहेत.पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय हालचालींना वेग आला असून, गेली चार दिवसात नामनिर्देशन पत्रांची विक्री म्हणजे शुक्रवार पासून, सुरू झाली असून, आज रोजी 363अर्जाची विक्री झाल्याची माहिती पुरंदर निवडणूक कार्यालयाने दिली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवार (ता.१६) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 87 उमेदवारी अर्जाची विक्री झाली, तर दुसऱ्या दिवशी शनिवार (ता.१७) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत 73 अर्जाची विक्री झाली आहे. सोमवार (ता. 19) रोजी 113अर्ज विक्री तर मंगळवार या दिवशीच 90अजॅ होऊन जिल्हापरिषद गटासाठी उमेदवारी अर्ज 16 दाखल झाले आहेत. तर पंचायत समिती साठी 19अजॅ जमा झालेत यामुळे बुधवार शेवटचा दिवस आहेत अर्ज विक्री व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंचायत समिती सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणूक लक्ष्यवेधी ठरेल यात शंकाच नाही. सर्वच ठिकाणी उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणूक लक्ष्यवेधी ठरेल. याबाबत सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (प्रांत) वर्षा लांडगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांनी सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments