पुरंदर तालुक्यातील गुरोली या ठिकाणी तरुणावर गोळीबार;तर 24 तासांमध्ये मुख्य आरोपी अटकेत ;सात जण फरार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्यूज: पुरंदर तालुक्यातील गुन्हेगारीला हादरून सोडणारया थरारक अशा प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर 24 तासांमध्ये सासवड पोलिसांना एक प्रकारचे चांगले यश आले आहे. गुरोळीतील हॉटेल समोर भर रस्त्यामध्ये दांडके, कोयता आणि गावठी पिस्तुलाचा वापर करत तरुणावर जीवघेणा असा हल्ला करण्यात आला होता, या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आलेली आहे,गुरोळी येथील हॉटेल महाराजा परमिट रूम अँड बियरबार समोर शुक्रवारी दिनांक 16 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारामध्ये हा प्रकार घडलेला असून कृष्णा बाबासो हवलदार वय 26 राहणार उरुळी कांचन यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात जणांनी अचानक हल्ला केला, याच वेळी एका आरोपीने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला ,तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या आरोपीने गावठी पिस्तुलातून एक गोळी हवेत झाडली ,तर दुसरी गोळी थेट फिर्यादीच्या दिशेने झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणी कृष्णा हवलदार यांच्या फिरेदीनुसार सासवड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेली आहेत, गुन्ह्याचे गांभीरहे लक्षात घेऊन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल ,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली तपा साला वेग मिळाला असून, स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस ठाण्याचा चार स्वतंत्र पतकांनी, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या मदतीने आरोपींचा मार्ग काढला असून, या गुन्ह्यांमध्ये विनीत सोमनाथ कुंजीर, स्वराज खेडेकर, दीपक व भैय्या खेडेकर, सोहम गोरड ,राहुल खेडेकर सर्व राहणार गुरोळी तालुका पुरंदर येथील भावेश बाळासो कुंजीर, राहणार आंबळे तालुका पुरंदर शुभम कुंभारकर राहणार वनपुरी तालुका पुरंदर कुकेश भिसे राहणार सासवड तालुका पुरंदर या आरोपींचा सहभाग असल्याचे, समोर आले आहे, त्यापैकी मुख्य आरोपी अथर्व श्रीकांत जगताप वय 19 राहणार सुपे खुर्द तालुका पुरंदर याला ताब्यात घेण्यात आले आहे, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्याला अटक करण्यात आली असल्याने, न्यायालयाने त्यास 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे, फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आलेली आहेत, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments