Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे 'ग्रँड टुर 'साठी आजपासून वाहतुकीमध्ये बदल पुरंदर, भोर,राजगड, हवेली तालुक्यात पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे' ग्रँड चॅलेंज टूर 2026 सायकल स्पर्धेचा बुधवारी दि. 21 रोजी दुसरा टप्पा पार पडणार आहे, टप्पा दुसरा पुरंदर ,भोर, राजगड व हवेली तालुक्यातील मार्गावरून मार्ग क्रमांक असल्याने या तालुक्यांमधील सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे व काही ठिकाणी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केलेले आहेत. सासवड पोलीस ठाणे हद्दीतील बोपगाव व माची हॉटेल बोपदेव घाटमाथा ऑस्करवाडी भिवरी, बोपगाव, चाबळी, कोडीत बुद्रुक, नारायणपूर,चिवहेवाडी, देवडी, केतकावळे असा आहे. बुधवारी येथील वाहतूक वळविण्यात येऊन पुणे कोंढवा बाजूकडून बोपदेव घाट मार्गे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, तसेच सासवड बाजूकडून कोंढवा बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून, ही वाहतूक सासवड बोरावके मळा बायपास पवारवाडी, दिवे घाट मार्गे मंतरवाडी अशी वळवण्यात येणार आहे, सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील सासवड कडून कापूरहोळ कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून, ही वाहतूक सासवड वीर फाटा मार्गे परींचे वीर तोंडल सारोळा येथून महामार्गावरून कापूरहोळ अशी वळविण्यात येणार आहे, तर कापूरहोळ कडून चिवहेवाडी घाट मार्गे सासवड कडे जाणारी संपूर्ण वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, अशी सविस्तर माहिती व सूचनांचे उल्लेख सायकल टूर निमित्त सर्व नागरिकांना वाहतुकीतील बदल करण्यासाठी या ठिकाणी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments