पुरंदर तालुक्यात पहिल्याच दिवशी एकही उमेदवार अर्ज नाही; तर माजी आमदार संजय जगताप व विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्यातच सासवड, जेजुरी व फुरसुंगी -उरुळी देवाची येथे नगरपालिकेसाठी खरी लढत होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आरक्षण व दि. जाहीर झाल्यापासून सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी ,अपक्ष गट ,काँग्रेस, उद्धवश सेना यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून, नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच असून, इच्छुक उमेदवार, सोशल मीडिया, प्रत्यक्ष गाव भेटीद्वारे संपर्क सादर करत असून, प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी मुलाखती घेण्याचा धडाका लावलेला असून ,एकूण सासवड नगरपालिकेची निवडणूक यावेळी मोठी चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे, सासवड नगरपरिषदेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत चंदूकाका जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जनमत विकास आघाडीने बाजी मारलेली होती, त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी युतीविरुद्ध, काँग्रेस प्रणित जनमत विकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत झालेली होती, यामध्ये जनमत विकास आघाडीचे मार्तंड भोडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले होते. जनमत विकास आघाडीचे 14, शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले होते, यावेळी संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे, निवडणुकीची समीकरणे बदललेली असून, नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ,इच्छुकांच्या संख्येमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे ,नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार संजय जगताप यांची भूमिका ही गुलदस्त्यामध्ये आहे, सध्या भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 20 जणांनी भाजप पक्षाकडे उमेदवारी अर्ज केलेले आहेत, तर शिवसेनेच्या वतीने सचिन भोंगळे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानले जात आहे, राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात असून, शिंदे सेनीशी युती झाल्यास राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे, सासवड नगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या या ठिकाणी नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून, प्रभाग संख्या 11 झाली असून ,नगराध्यक्ष आणि 22 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत, गेली 20 वर्षापासून काँग्रेस प्रणित आघाडीची नगरपरिषदेवर सत्ता होती, 2024 विधानसभा च्या निवडणुकीनंतर संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे, निवडणुकीचे चित्र हे पूर्णपणे बदललेले आहे ,नगरपालिकेच्या 22 जागांसाठी भाजपमध्ये 100 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेले आहेत, काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले संजय जगताप यांना नगरपरिषदेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार लढत द्यावी लागणार असल्याचीही शक्यता आहेच, सासवडमध्ये आमदार विजय शिवतारे यांनीही पूर्णपणे ताकतीने लढणार असल्याची ही घोषणा केलेली आहे .सासवड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे, नियोजित विमानतळ जवळच असल्याने, येथील नगरपरिषद ताब्यात ठेवण्यासाठी महायुतीतील दोन्ही नेते जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत, महायुतीतील सत्ताधारी प्रमुख पक्षातच लढती होणार असल्याने, त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे .जगताप आणि शिवतारे यांची खरी लढत पुरंदर तालुक्यात व हवेली मध्ये दिसून येणार आहे. माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे, भाजपच्या वतीने स्वबळावरच कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने, नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा संजय जगताप विरुद्ध आमदार विजय शिवतारे यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments