नगरपरिषद नगरपंचायतीसाठी आजपासून रणधुमाळी दिनांक 17 पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार दोन डिसेंबरला मतदान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्ह्यातील 14 नगरपरिषद 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी दिनांक 10 पासून सुरू होणार आहे, 398 सदस्य पदाच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये भरता येणार आहेत, यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून, त्यांची प्रिंट काढून, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे ,अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे ,राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या, त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायती असून निवडणुकीचे वेळापत्रक 10 ते 17 नोव्हेंबर उमेदवारी, अर्ज भरण्याचा कालावधी दुपारी दोन वाजेपर्यंत, 18 नोव्हेंबर उमेदवारी अर्जाची छाननी, 19 ते 21 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेता येणार, दुपारी तीन वाजेपर्यंत .26 नोव्हेंबर निवडणूक चिन्हाचे वाटप ,2 डिसेंबर मतदान ,3 डिसेंबर मतमोजणी.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments