पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथील सरपंचाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी आरोपी प्रशांत राणे यांची येरावडा कारागृहात रवानगी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन या परिसरामधील अवैध धंदे,दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीचा दादागिरी पूर्ण हौसच चांगलीच महागात पडली असून, त्याने थेट गावच्या सरपंचांनाच पिस्तुलाचा धाक धाकवून धमकावल्याप्रकरणी जवळार्जुन या परिसरामध्ये एक चांगलीच खळबळ उडालेली असून, प्रशांत रमेश राणे असे या आरोपीचे नाव असल्याकारणाने, त्याला जेजुरी पोलीस स्टेशन यांनी अटक करून, त्याला न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली होती ,त्यानंतर राणे याला येरावडा कारागृहामध्ये रवानगी करण्यास आल्याची माहिती ,जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी ही माहिती दिली .याप्रकरणी सरपंच सोमनाथ दत्तात्रय कणसे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आरोपी विरुद्ध गंभीर गुन्ह्यात कारवाई करण्यात आली होती ,फिर्यादीने नोद केल्या प्रकरणी हा प्रकार साधारण रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रशांत राणे यांनी सरपंच सोमनाथ कणसे यांच्यावर थेट हल्ला चढवला ,अवैध दारू विक्रीचा धंदा बंद पाडल्याच्या राग मनात धरून ,राणे यांनी बेकायदेशीर पिस्तूल दाखवून, सरपंचांना जीवे मारण्याची धमकी दिली, एवढेच नाही तर काही साक्षीदारासमोर दोन लाख रुपयाची ही मागणी केल्याचे ,फिर्यादीमध्ये नमूद केलेले असून ,या घटनेनंतर सरपंच कणसे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ तपासाची सुरुवात केली असता ,आरोपी राणेला सोमवारीच अटक केली होती, त्यानंतर सासवड न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती, सरपंचावर झालेल्या या धक्कादायक हल्ल्यामुळे अवैध धंद्यांना मिळणारे बळ आणि त्याच्या दबावाची प्रकरणी पुन्हा एकदा उजेडात आली आहेत ,असे बहुतेक ठिकाणी अवैध धंदे पुरंदर तालुक्यामध्ये सध्या तरी चालू आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments