पुरंदर तालुक्यातील जेजुरी चार प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची लढत; तर नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक/ नगरसेविका पदासाठी 50 जण रिंगणात जेजुरी प्रतिनिधी: मयूर कुदळे जेजुरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आत्ता सध्या तरी नगराध्यक्ष पदासाठी तीन ,तर नगरसेविका/ नगरसेवक पदासाठी 50 जण रिंगणात असून, लढत ही तिरंगी होणार आहे, हे निश्चित झाले आहे,नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सचिन रमेश सोनवणे, राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून जयदिप दिलीप बारभाई आणि शिवसेना शिंदे गटाकडून दिनेश दिलीप सोनवणे हे रिंगणात आहेत, नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही तिरंगी होणार आहे, नगरसेवक पदासाठी प्रभाग एक, पाच, सहा, व नऊ या ठिकाणी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ सरळ दुरंगी लढत, तर इतर ठिकाणी शिवसेना शिंदे गट, शिवसेना उ.बा.ठा गट आणि काँग्रेस यांचे उमेदवार असल्याने, बहुरंगी लढतीचे चित्र आहे, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत बंडखोरी केली होती, मात्र नेत्यांनी त्यांची बंडखोरी शेमवण्यात यश आले असून, भाजपचे माजी शहराध्यक्ष गणेश भोसले यांनी प्रभाग एक मधून शिवसेनेची उमेदवारी मिळवून बंडाचे निशाण फडकवले होते ,मात्र त्यातून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने चर्चेतून मार्ग काढून, त्यांना थांबवले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान शहराध्यक्ष रमेश लेंडे यांना पक्षाकडून उमेदवारी दिली नसल्याने,त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, मात्र त्यांनी सुद्धा चर्चा झाल्यानंतर अर्ज माघार घेतली आहे, तर चालूच्या निवडणुकीमध्ये आजी-माजी पदाधिकारी हेच आपापल्या कुटुंबातील उमेदवार उभे केलेले आहेत, असे चित्र सध्या तरी जेजुरी मध्ये दिसून येत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments