Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेत 11 प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट लढत; तर प्रभाग चार ब मध्ये बिनविरोध स्मिता सुहास जगताप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: अर्ज माघारी नंतर सासवड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी आनंदी (काकी )जगताप, (भाजप).सचिन सुरेश भोंगळे (शिवसेना शिंदे गट ),अभिजीत मधुकर जगताप (महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट )आणि निकिता राजेंद्र धोत्रे अपक्ष हे चार उमेदवार रिंगणात आहेत, प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये भाजपच्या उमेदवार राजेश्री वैभव इनामके यांना छाननीच्या दिवशी निर्धारित वेळेत पक्ष उमेदवारी अर्ज न मिळाल्याने, विरुद्ध उमेदवार शिवसेनेच्या हेमलता मिलिंद इनामके यांचा एकमेव अर्ज राहिला आहे, याबाबत भाजपने न्यायालयात धाव घेतली असून ,त्याचा निर्णय हा 25 नोव्हेंबरला होणार आहे, विशेष म्हणजे सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीत" राष्ट्रवादीचे घड्याळ" प्रामुख्याने गायब झाले आहे, भाजप नगराध्यक्ष पदासाटी व नगरसेवक/ नगरसेविका पदासाठी २२ जागा मधुन प्रभाग क्रमांक ११ अ मधील न्याय प्रविष्ट निर्णय असल्याकारणाने, अधिकृतरित्या अजून घोषित केले नाही, की शिवसेना शिंदे गट हेमलता मिलिंद इनामके या बिनविरोध निवड झाली आहे असे, कारण त्यांचा निर्णय न्यायालय 25 नोव्हेंबरला निकाल देणार आहेत, प्रभाग क्रमांक एक ब मधून अपक्ष, प्रभाग क्रमांक तीन अ मधून शिवसेना उ.बा.ठा गट, प्रभाग क्रमांक तीन ब मधून अपक्ष ,प्रभाग क्रमांक पाच अ मधून अपक्ष प्रभाग क्रमांक 9 व मधून अपक्ष असे असताना, प्रामुख्याने भाजप नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक/ नगरसेविका पदासाठी 21 जागा लढवीत असून, शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष व नगरसेवक/ नगरसेविका पदासाठी 22 जागा लढवीत असून, त्यामध्ये शिवसेना उ.बा.ठा ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, पदासाठी व नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवीत आहेत, तर अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक/ नगरसेविका पदासाठी चार अपक्ष निवडणूक लढवत आहेत, सासवड नगर परिषदेसाठी.

Post a Comment

0 Comments