Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री दत्त जयंती सोहळा; तर आरोग्यसेवा, पाणी पुरवठा व वाहतुकीचे नियोजन काटोकोरपणे करावे :उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र नारायणपूर ता. पुरंदर येथे दि. २ ते दि. 4 डिसेंबर या काळामध्ये श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून, हा सोहळा परमपूज्य श्री नारायण महाराज (अण्णा) यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली होणार असून, या निमित्त यात्रेच्या नियोजनासाठी शुक्रवारी दि. 21 रोजी बैठक पार पडली. यावेळी विविध सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सहकार्य करणार असल्याचे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले. या सोहळ्यानिमित्त मंगळवारी दि. 2 डिसेंबर अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञ कुंडाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे, सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ साजरा केला जाणार आहे, या ठिकाणी सकाळी पालखी मंदिरातून निघेल, ग्राम प्रदक्षिणा करून चार वाजता स्थळी पोहोचेल तेथे यज्ञकुंड व अग्निपूजन होईल ,त्यानंतर दीप पूजा प्रज्वलित होऊन, शिवदत्त नामाचे हवन होईल, त्यानंतर यज्ञकुंड, अग्नी दर्शन, गंध, घुगऱ्याचा प्रसादाचे वाटप पालखी मंदिरात येऊन, आरती होईल, श्री दत्त मंदिरामध्ये बुधवारी दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहा आरती, दुपारी एक ते तीन वाजता विविध गावातून येणारे दिंड्यांचे स्वागत केले जाईल, तीन ते चार भजन, चार ते साडेपाच पर्यंत पादुकावर रुद्राभिषेक होईल, दत्त जन्म सोहळा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी होणार, आहे.श्री दत्त जन्मप्रसंगी परम पूज्य टेंबे स्वामी महाराज यांचे जन्म व्याख्यान, आरती, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, सुटवडा वाटप व देव भेटवणे तसेच रात्री नऊ वाजता महाप्रसाद व शोभेचे दारूकाम होईल. रात्री दहा वाजता कीर्तन, बारा वाजता भजन, भारुडाचा कार्यक्रम होईल. दत्त जयंतीचा गुरुवारी दि. 4 डिसेंबर रोजी समारोप दिवस आहे ,त्या दिवशी पहाटे चार ते सहा वाजता नारायनेश्वर, महादेव मंदिर व श्री दत्त मंदिरात रुद्राभिषेक, सहा ते साडेसात वाजता पोर्णिमा हवन, साडेआठ ते नऊ आरती, होऊन मंदिरातून पालखी प्रस्थान होईल, ढोल, लेझीम, हत्ती, घोडे, ब्रँड यांच्यासह मिरवणूक पालखी, चंद्र बागा स्नानासाठी प्रस्थान ठेवेल ,सकाळी दहा वाजता चंद्रभागा कुंडावर पोहोचेल, देवस्नान होऊन, गावातून मिरवणुकीने पालखी मंदिरात दीड वाजता पोहोचेल ,त्या ठिकाणी श्री दत्त जयंती सोहळा प्रवचन व भाविक भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे, पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन, रात्री दहा वाजता आरतीने सोहळ्याची सांगता होईल ,याबाबत दत्तमिंदराचे व्यवस्थापक भरत नाना शिरसागर यांनी ही माहिती दिली. या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील ,पोलीस निरीक्षक कुमार कदम, सासवड नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक गजानन नरवडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments