पुरंदर तालुक्यातील श्री शेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरामध्ये चोरी; तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथील ढसाडे मळ्यामधील श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरामध्ये गुरुवारी रात्री चोरी झाली असून, या चोरीमध्ये मंदिरातील मोठ्या समयी, हॅलोजन, स्पीकर, मशीन, घंटी, बादली, जग, गंगाळ अशा विविध प्रकारच्या तांब्याच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत, तरी हा चोरीचा प्रकार शुक्रवारी दिनांक 21 रोजी सकाळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या धसाडे बंधूंच्या लक्षात आले असता, त्यानंतर त्यांनी परिंचे पोलीस चौकीला याबाबत कळवले, त्यानुसार परिंचे पोलीस चौकीचे हवालदार सचिन पवार, व्ही. एल. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन, त्या ठिकाणचा पंचनामा केला, या घटनेचा पुढील कार्यवाही सासवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे, परिंचे पोलीस चौकीचे हवालदार सचिन पवार व व्ही. एल.जाधव यांनी सांगितले
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments