Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरोळी मध्ये 'पोषण भी पढाई भी' महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गुरोळी (ता-पुरंदर) शासनाचा 'पोषण भी पढाई भी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. अंगणवाडीतील लहान बालकांना आपलेपणाने समजावून घ्यावे, पालकांचे समुपदेशन करावे, नवीन पौष्टिक पदार्थांची अंमलबजावणी करावे, सक्षम अंगणवाडी, आहार पद्धती व शैक्षणिक दृष्टिकोन याबाबत क्षमता विकसित करावी" असे आव्हान बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी केले.पोषण भी पढाई भी या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवार (ता. 17) गुरोळी (तालुका पुरंदर) येथे अनिल कांबळे यांच्या हस्ते झाले. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रस्तावित केले. त्यांनी पोषण भी पढाई भी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले या तीन दिवसीय प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर म्हणून संध्या खामकर, नीलम वाघ विस्तार अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. पुष्पल माळी यांनी सूत्रसंचालन केले व माणिक देडगे यांनी आभार मानले. यावेळी गुरोळी माजी सरपंच रामचंद्र खेडेकर, हिरामण खेडेकर, संपत खेडेकर, नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र चांदगुडे, शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खेडेकर, विस्तार अधिकारी बाळकृष्ण काकडे, पर्यवेक्षिका माणिक देडगे, पंचशीला काकडे, अरुणा खेडेकर, पुष्पल माळी, अनिता भुजबळ, मनीषा भोसले, कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य लाभलेल्या अंगणवाडी सेविका माया खेडेकर, वंदना खेडेकर व मदतनीस ताई माकर व ज्योती वाघमारेमुलांचे आरोग्य व दर्जेदार शिक्षणासाठी उपक्रम पोषण भी पढाई भी अभियानाद्वारे अंगणवाडी येणाऱ्या ३ ते 6 या वयोगटातील लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण या तीनही गोष्टींवर समान भर देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधने हा आहे. कुपोषण कमी करणे, योग्य आहार व आरोग्य तपासणी सुनिश्चित करणे, शिक्षणास प्रोत्साहन देणे अंगणवाडी सेविकांचे आधुनिक प्रशिक्षण तसेच पालकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख हेतू आहेत एकूणच मुलांच्या आरोग्य चांगले ठेवून चांगले शिक्षण मिळावे यासाठी हे प्रशिक्षण राबविण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments