शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध विषयांचे भव्य वार्षिक प्रदर्शन उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. २० व २१ नोव्हेंबर या दिवशी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड. येथे विविध विषयांचे भव्य वार्षिक प्रदर्शन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सजलेले हे प्रदर्शन ज्ञान, कलादालन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उजळून निघाले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोविंदराव लाखे, प्रशासन अधिकारी – नगर परिषद शिक्षण विभाग, सासवड. वैभव डुबल, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, पुरंदर.हे उपस्थित होते.प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.या प्रदर्शनातमराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, चित्रकला, संगीत, क्रीडा, आयटी, वर्क एक्सपिरीयन्सया विषयांतील प्रकल्प, मॉडेल्स, पोस्टर्स आणि प्रयोगांचे अत्यंत सुंदर सादरीकरण करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी केलेली प्रत्येक मांडणी कौतुकास्पद होती. शिक्षकांच्या परिश्रमामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे प्रदर्शन अतिशय भव्य आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध झाले. गोविंदराव लाखेसर मनोगत व्यक्त करताना म्हणाले,“या प्रदर्शनात प्रत्येक विषयाला समान न्याय दिलेला असून विद्यार्थ्यांची सादरीकरणे उच्च दर्जाची आणि उल्लेखनीय आहेत.” वैभव डुबलसर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे व शाळेचे काम प्रशंसनीय आहे.”“पुढील वर्षी विज्ञान प्रदर्शनात एआय आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहायला मिळावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.माजी मुख्याध्यापक उल्हास काशिनाथ ताकवलेसर आपल्या मनोगतात म्हणाले,“विज्ञान प्रदर्शने अनेकदा पाहिली, परंतु सर्व विषयांचे असे बहुआयामी प्रदर्शन क्वचितच दिसते. तसेच माझ्या विद्यार्थिनी या विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत आहेत, याचा मला विशेष अभिमान वाटतो.”प्रदर्शनाच्या यशस्वीतेत विद्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.आदरणीय प्राचार्या श्रीमती रेणुका सिंग मर्चंटउपप्राचार्या सौ. सुषमा रासकरज्यु.विभाग प्रमुख उज्वला जगतापपूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख स्वाती जगतापहेही उपस्थित होते.या सर्व मान्यवरांनी प्रत्येक विभागाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शिक्षकांचे मार्गदर्शनाबद्दल अभिनंदन केले.प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मनापासून मेहनत घेतली.विद्यार्थ्यांनी दाखविलेली नावीन्यपूर्ण कल्पकता, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्य अत्यंत प्रभावी होते. प्रत्येक प्रकल्पामागे त्यांच्या कष्टाची आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची झलक स्पष्टपणे दिसून आली.या प्रदर्शनास पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही पालक, नागरिक आणि विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत होते.संस्थेतील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनीही प्रदर्शनाचे मनापासून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविले.शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्कृष्ट व्यासपीठ ठरले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments