पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे 2 उमेदवार यांनी माघार घेतली; तर नगरसेवक पदाचे उमेदवार पैकी 24 उमेदवारांनी माघार घेतली व बिनविरोध निवड स्मिता सुहास जगताप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर नगरपरिषद निवडणुकीत गुरुवार दि. 20 रोजी 1 उमेदवाराने माघार घेतली, तर आज शुक्रवार दि. 21 रोजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये 2 उमेदवारांनी माघार घेतली, तर नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये आज 23 उमेदवारानी आपली माघार घेतली, पुढील लढतीसाठी सासवड नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर नगरसेवक पदासाठी 47 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माघार घेतलेले: घाटे दत्तात्रेय युवराज, जगताप वामन शिवाजी. तर नगरसेवक पदाच्या मध्ये उमेदवार माघार घेतलेले गुरुवार या दिवशी 11ब मधून रोहित भरत जगताप तर आज शुक्रवार या दिवशी जगताप आकाश संजय, टकले दिपक दत्तात्रय, कल्याणकर रवी नरसिंग, बागवान हरून हसन, भोंडे साधना राहुल, भोंडे रेश्मा सचिन, भोडे सचिन दामू, जगताप महेश प्रकाश, गिरमे संजय निवृत्ती, कसबे राजेंद्र चंद्रकांत, भोंडे महेश मारुती, जगताप जालिंदर श्रीरंग, होले निलम सचिन, आतार आरिफ गुलाब, सुभागडे निता उमेश कुमार, जगताप संतोष किसन ,झेंडे जीवन दगडू, पवार अतुल वसंत, गिरमे सोनाली राजेंद्र, जगताप प्रतिक्षा गणेश, टिळेकर अंजली लक्ष्मण, टिळेकर ज्योती संजय, पडलवार चैताली बालाजी या उमेदवारांनी आज आपले अर्ज माघार घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिली आहे .सासवड नगरपरिषद साठी नगराध्यक्ष पदासाठी सध्या तरी 4 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये आहेत, तर प्रभाग एक ते 11 मध्ये 22 जागा साठी 47 उमेदवार रिंगणामध्ये आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली तर भाजप कार्यालय सासवड मधून वाडॅ 4 ब मधून बिनविरोध भाजप ने सुधा खाते सासवड नगरपरिषद मध्ये खाते खोलले आहेच अशी माहिती मिळली आहेच.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments