पुरंदर तालुक्यातील तोंडल या ठिकाणीची शिक्षकांची कमतरता ही "जैसे थी "तर शाळेची व्यवस्था पूर्णपणे ढासळली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: तोंडल ता. पुरंदर या ठिकाणीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण व्यवस्था अक्षरशा: पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे, तर शाळेत पाच शिक्षकांची गरज असताना, केवळ फक्त दोन शिक्षकांच्या बळावरच शैक्षणिक प्रक्रिया सुरू असल्याने, तीन शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, मे 2025 मध्ये एका पदवीधर शिक्षकांचे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले होते, तर दुसऱ्या शिक्षकाची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती, याशिवाय एक उपशिक्षक पदही अद्याप भरलेले नसल्याकारणाने, शाळेत तातडीने तीन शिक्षकांची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षकांच्या तुटवडयामुळे सहावी सातवीतील 14 विद्यार्थ्यांनी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नहावी व वीर येथील शाळात जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे, त्यामुळे तोंडल शाळेतील पाचवी ते सातवी चे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर पोहोचलेले आहेत, तर या उलट पानवडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये केवळ 16 विद्यार्थी असतानाही, दोन उपशिक्षक आणि दोन पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत, सहावी सातवी केवळ तीन विद्यार्थी असूनही, दोन पदवीधर शिक्षकांची नेमणूक असल्याने,शिक्षक वाटपातील विसंगती स्पष्टपणे जाणवत आहे, मात्र तोंडलमध्ये आवश्यक असलेली तीन पदे रिक्त असल्याने, ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांच्याकडे अर्ज, निवेदने ,फोन तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे शिक्षकाचे मागणी सतत केली असता, शाळा बंद करण्याचा इशाराही दिला असताना, तरीही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. गट शिक्षण अधिकारी वैभव डुबल हे सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्यांसोबत काम पाहत असले, तरी शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवण्यात ते अपयशी ठरल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मात्र: त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे, तर यावर गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी पुरंदर पंचायत समितीचे यांना त्या ठिकाणच्या तोंडलच्या शाळेविषयी कधी विद्यार्थ्याबद्दल शिक्षक नेमण्याची भूमिका घेणार, ही सामान्य नागरिकांची मागणी आहे ,जर यावर गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी निर्णय घेणार नसतील, पुरंदर पंचायत समितीचे तर पुन्हा एकदा शाळेला टाळे लावण्यात येतील ,अशी सामान्य नागरिकांनी तोंडल येथील ही भूमिका घेतलेली आहे, याची सविस्तर सर्व माहिती सरपंच शरद वणवे यांनी प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments