पुरंदर तालुक्यातील मांढर, परिंचे, कोडीत, बुद्रुक, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेजुरी, मांडकी, झेंडेवाडी, नारायणपूर या वनक्षेत्रातील गावामध्ये बिबट्या या वन्य प्राण्यांचा वावर वाढला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड वन क्षेत्रातील मोजे मांढर,परिचे, कोडीत बुद्रुक, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेजुरी, मांडकी, झेंडेवाडी, नारायणपूर या गावांमध्ये बिबट्या या वन प्राण्यांचा वावर वाढलेला असून, त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत येणे, बिबट्या मार्फत पाळीव प्राणी,, भटके कुत्रे, यांच्यावर हल्ले होणे, तसेच शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना बिबट्या दिसणे, औद्योगिक क्षेत्रात बिबट्याच्या वन प्राण्यांचा वावर वाढणे, अशा घटनांमध्ये नजीकच्या काळामध्ये वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे मानवी वस्तीमध्ये शिरलेला बिबट्या पकडून, नैसर्गिक अभिवाचन मते सोडण्याकरता आवश्यक असणारे, बिबट्या पिंजरे याची संख्या वाढवणे आवश्यक असल्याने, दि. 20 नोव्हेंबर रोजी जेजुरी येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज यांच्यामार्फत कंपन्याची सामाजिक जबाबदारी सीसीआर निधी मधून एकूण पाच बिबटे, पिंजरे सासवड वनपरक्षेत्र कार्यालयास पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापैकी बिबट पकडण्याकरिता लागणारा 01 पिंजरा किलोस्कर फेरस इंडस्ट्रीज जेजुरी यांच्यामार्फत वनपरिक्षेत्र कार्यालय सासवड येथे देण्यात आला आहे, सदर कार्यक्रमाच्या वेळी माननीय उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, माननीय सहाय्यक म्हणून संरक्षक भोर श्रीमती शितल राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमास सागर ढोले वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड, गणेश पवार वनपाल सासवड, राहुल रासकर वनपाल परिंचे, श्रीमती दिपाली शिंदे वनपाल जेजुरी, व कार्यालयीन कर्मचारी तसेच किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री जेजुरी यांच्यामार्फत 20 सत्यमूर्ति फ्लॅट हेड यांच्या मार्गदर्शनाखाली रेजी के , जब्बार पठाण, प्रवीण पवार, सागर झोपे, सुरज भोईटे ही आधी उपस्थित होते. वन विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, बिबट्या प्रवण क्षेत्रात वावरताना ,लहान मुले, यांना एकटी सोडू नये, तसेच शेतीची कामे करताना शेतामध्ये रात्रीच्या वेळी जाताना समूहात जावे, काम करावे, सोबत मोबाईलवर गाणे सुरू ठेवावेत व जोरात बोलता काम करावीत, तसेच आपली पाळीव जनावरे ,बंदिस्त गोठ्यात ठेवावीत, घराभोवती रात्रभर दिव्याचा उजेड राहील याची काळजी घ्यावी, तसेच घराभोवती भटके कुत्रे येऊ नये ,याकरिता घराभोवती कचरा, उरलेले अन्न टाकू नये, तसेच कोठेही बिबट्या वन प्राण्यांचा वावर आढळल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे अशी माहिती सागर ढोले वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments