पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी साहेबराव फडतरे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बोपगाव ता. पुरंदर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक साहेबराव मारुती फडतरे यांची पुरंदर तालुका काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदावर नियुक्ती केल्याचे, पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिले ,यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय छाजेड, काँग्रेस नेते देविदास बनसाळी, प्रदेश काँग्रेस कमिटी किसान सेलचे भानुदास माळी, जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार, जिल्हा काँग्रेस शेतकरीचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, उपाध्यक्ष गणेश ढोणे, जिल्हा शिक्षक आघाडी सेलचे उपाध्यक्ष प्राध्यापक सचिन दुर्गाडे, पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, पुरंदर तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष गणेश थोपटे, आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने माझ्यावर प्रभारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, ती निश्चितच उत्तम प्रकारे पार पाडेल, काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही प्रामाणिकपणे व जिद्दीने करेन, असेही फडतरे यांनी सांगितले. अशी सर्व माहिती प्रभारी अध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments