वीर गणातून किशोरभाऊ वचकल यांना ओबीसी बहुजन पक्षाची उमेदवारी जाहीर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात कार्य करणारे वीर गावचे सुपुत्र किशोरभाऊ वचकल यांना ओबीसी बहुजन पक्षाची पुरंदर पंचायत समिती वीर गणातून उमेदवारी जाहीर झाली. यावेळी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे, अँड. मंगेश ससाणे, आदी उपस्थित होते. किशोर वचकल याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सामजिक क्षेत्रात कार्य करत असताना, सामन्यांचा आवाज निर्णय घेणाऱ्या टेबलपर्यंत पोहचत नाहीये तो आवाज पोहोचवण्यासाठी मी उमेदवारी करत आहे. गरीब, कष्टकरी, वंचित, बहुजन समाजाचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडणे ते सोडवून घेणे हे महत्वाचे काम राहील. पंचायत समिती च्या अनेक योजना आहेत परंतु त्या आजपर्यंत जनतेपर्यंत पोहचल्या नाही त्या मध्येच थांबल्या जातात, किंवा त्या पोहचू दिल्या जात नाहीत. या सर्वांसाठी मी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती प्रतिनिधी ला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments