१७ जानेवारी रोजी स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा प्रशाला व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल सासवड शाखेत ,स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त खाद्य जत्रा व ज्ञान शिदोरी दिन साजरा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभय कुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले .आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान सासवड चे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापक मंडळाचे सदस्य मा. संतोष जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता म्हेत्रे व वीर बाजी पासलकर शाळेच्या मुख्याध्यापिका खळदकर मॅडम उपस्थित होत्या.प्रतिमा पूजनानंतर शाळेतील सर्व मुलांनी आपल्या गीतातून माननीय अभय कुमारजी साळुंखे यांना वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा दिल्या आलेल्या पाहुण्यांनी सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊन त्यांचे कौतुक केले .या उपक्रमातून मुलांना नफा तोटा हे गणित समजले. तसेच कोणत्या पदार्थांची विक्री केल्यास त्याचा खप जास्त होईल हेही त्यांना उमगले. आलेल्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या पालकांनीही खाद्य जत्रेचा आस्वाद घेतला व सहभाग नोंदवला.स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा प्रशालेचे सर्व गुरुदेव कार्यकर्ते व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल सासवड यांचे गुरुदेव कार्यकर्ते व शिक्षकेतर सेवक यांनी कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका काळभोर एस. एम. व सूत्रसंचालन सोनवणे एस. टी. यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments