पौष वद्य अमावस्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देवस्थान ट्रस्टचा नामांकित यंदाचा यात्रा उत्सव काही दिवसावर आलेला असल्याने, यात्रा पूर्वनियोजन तयारीची लगबग पहावयास मिळाली.रविवार व अमावस्या एकत्र आल्याने, खास भाविकांची मोठी गर्दी मंदिरात होती.पहाटे धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सकाळी ६ वाजता गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या, देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळीचा गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर चालू होता.दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद होता.१.३० वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला झाला. महाप्रसादाचे आयोजन समस्त पान व्यापारी वीर, विजयकुमार धुमाळ व वाल्हेकर बंधू यांचे मार्फत करण्यात आली होती. भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, होमगार्ड, जादाचे कर्मचारी, परिसर स्वच्छता, यांची व्यवस्था करण्यात आल्याचे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सर्व विश्वस्त मंडळ,ग्रामस्थ उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments