Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघीरे महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे आयोजन ॲड संदिप कदम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील वाघीरे महाविद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा दि. २९ व ३० डिसेंबर रोजी सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, यांनी माहिती दिली. सासवड (ता .पुरंदर) येथील वाघीरे महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मानद सचिव अॅड. संदीप कदम, बोलत होते, ते पुढे म्हणाले,की या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळा मध्ये प्रामुख्याने बुद्धिबळ, योगासने, कुस्ती, कराटे–तायक्वांदो, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारांचा समावेश असून ३,९११ खेळाडू थेट जिल्हास्तरीय फेरीत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, गटस्तरीय फेऱ्यांमध्ये १५,००० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सांघिक स्पर्धेत प्रथम आणि वैयक्तिक प्रकारात प्रथम दोन क्रमांक मिळविणारे खेळाडू जिल्हा स्तरावर पात्र ठरतील, अशी स्पर्धेची रचना निश्चित करण्यात आली आहे.या स्पर्धांचे उद्घाटन सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.३० वा. खासदार सुनेत्राताई पवार आणि प्रवरा मेडिकल संस्थेचे कुलगुरू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास राजकीय, सामाजिक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ,हा सोहळा ग्रामीण क्रिडा संस्कृतीचा उत्सव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए.एम. जाधव, प्राचार्य, क्रिडा शिक्षक आणि सर्व शाखाप्रमुखांच्या अथक नियोजन व परिश्रमातून या स्पर्धा साकार होत आहेत. या स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून, ग्रामीण मातीतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयोजित केल्या आहेत, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. “या क्रीडा उपक्रमांतून पुरंदरच्या मातीतून जागतिक स्तरावरील खेळाडू घडतील,” असा दृढ आशावाद त्यांनी बोलून दाखवला.संस्थेच्या या शैक्षणिक व क्रीडा वाटचालीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा संधींचे त्रिवेणी संगम असलेले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या काळातही ही स्पर्धाअधिक व्यापक, गतिमान होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रास्ताविक वाघीरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेठ रघुनाथ गोविंद साबळे कॉलेजच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments