पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धा 2025–26 मध्ये सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सासवड या विद्यालयाने आपल्या कलागुणांचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तालुकास्तरावरील स्पर्धेत प्राथमिक गटाने द्वितीय क्रमांक पटकावला असून, या गटातील एकूण सहा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्राप्त होणे ही विशेष अभिमानाची बाब आहे. प्राथमिक गटाच्या नाटिकेचे कुशल नाट्यदिग्दर्शन सुनीता विकास नवले यांनी केले.त्याचप्रमाणे माध्यमिक गटाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशपरंपरेत भर घातली आहे. या नाटकातील तीन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्राप्त झाले असून, ह्या नाटिकेची जिल्हा स्तरासाठी निवड करण्यात आली आहे.माध्यमिक गटाच्या नाटकाचे प्रभावी नाट्यदिग्दर्शन शितल श्रीराम बोरुडे यांनी केले.या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांसह विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट मॅडम, उपप्राचार्य सुषमा रासकर , ज्युनियर कॉलेज इन्चार्ज उज्वला जगताप , प्री-प्रायमरी इन्चार्ज स्वाती जगताप तसेच विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ही घवघवीत कामगिरी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळालेली योग्य दिशा, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि विद्यालयातील सर्जनशील, संस्कारक्षम वातावरणाचे प्रेरणादायी प्रतीक ठरत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments