Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणी उत्सवावर शोककळा पसरली सासवड प्रतिनिधी: भुलेशवर देवस्थानच्या श्रावण यात्रेसाठी मानाची तेल्या भुत्याची कावड आणण्यासाठी जात असताना, अपघात झालेल्या अक्षय बाळासो यादव (वय 26 )याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला, यामुळे माळशिरस ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.सासवड येथील श्रावणी यात्रेसाठी मानाची तेल्या भुतयाची कावड दरवर्षी आणली जाते, सालाबाद प्रमाणे ही कावड आणण्यासाठी जात असताना, प्रवास करताना सासवड नजदिक आंबोडी याठिकाणी माळशिरस येथील अक्षय यादव यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता, अपघातानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु रात्री उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाला, रात्री उशिरा त्याच्यावर माळशिरसमध्ये अत्यसंस्कार करण्यात आले, अक्षयच्या अशा अपघाती जाण्याने माळशिरस कर, सर्व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत, काही दिवसापूर्वीच अक्षयच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यानंतर अक्षयच्या जाण्याने यादव कुटुंबावर दुःखाचा एक मोठा डोंगरच उभा झालेला आहे, त्यामुळे यादव कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.

Post a Comment

0 Comments