सासवड मधील मुदतीमध्ये कामे न झाल्यास इथून पुढे आंदोलन करणार; भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप सासवड प्रतिनिधी: सासवड नगरपालिका पाणी, डेनेज आणि रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत असून, शहर भाजप आक्रमक झाली आहे. प्रशासनाने कामे पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत मागितली असून, या मुदतीत कामे न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष आनंद जगताप यांनी केला. भाजपने यापूर्वीही शहराच्या समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करीत 19 ऑगस्ट रोजी गाव बंदचा इशारा दिला होता, मात्र त्या आधीच सोमवारी दि. 18 पालिका प्रशासनाने आठ दिवसात केलेला कामाचे पत्र दिले. यानंतर मंगळवारी दि. 19 भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले. याप्रसंगी राजन जगताप यांनी शहरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्येवर बोट ठेवले तसेच शहरातील मुख्य भाजी मंडई, ऐवजी इतरत्र चार ठिकाणी भाजी विक्रेते बसतात व या माझी विक्रेत्याकडून ठेकेदाराकडून दुप्पट भाडे घेऊनही सुविधा पुरविल्या जात नाहीत, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, असाही आरोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील, तसेच पीएमटी स्थानक परिसरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांचा मुद्दा मयूर जगताप यांनी मांडला. एखादा अपघात झाल्यास त्यांची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याशिवाय मंदार टिळेकर, भूषण मचाले, संजय टिळेकर, संजय चव्हाण, यशवंतराव जगताप, जयेद निकम, संतोष जगताप, संतोष खोपडे, संदीप राऊत, अनिरुद्ध दोडके आणि तुषार जगताप यांनी निधी अभावी कामे थांबल्याबद्दल प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments