पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे सुवर्णकलशाची मिरवणूक; तर भीमा केशवर शंभू महादेव मूर्तीची प्रतिष्ठापना सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी ता. पुरंदर येथे भीमाकेशवर शंभू महादेव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, तसेच सुवर्ण कलशाची मिरवणूक सुद्धा गावातून काढण्यात आली, त्यानंतर मिरवणुकीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर मिरवणूक पुन्हा महादेव मंदिराजवळील त्या ठिकाणी पोचली. या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन, संत साहित्याची अभ्यासक राजेंद्र महाराज दहिभाते यांचे कीर्तन झाले, दुसऱ्या दिवशी 16 मार्च रोजी सकाळी मूर्तीचा मंदिरात प्रवेश करून, मूर्तींना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर तेजोनाथ महाराज राजाधिराज योगी 1008 श्री निर्मळ नाथजी श्री शेत्र नारायणपूर येथील पोपट महाराज टेंबे स्वामी संघ मनांत महाराज त्यागी महाराज यांच्या हस्ते मूर्ती स्थापना, कलशारोहण अधिक कार्यक्रम झाले, त्यानंतर प्रवचन व महाप्रसाद होऊन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कीर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांचे कीर्तन झाले, भिवडी ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, तात्यासाहेब भिंताडे, बापूसो दिघे, बाळासो भिंताडे, बाबुराव दिघे, रमेश मोकाशी, शामराव भिंताडे, शहाजी गायकवाड, विठ्ठल मोगाशी, साधू दिघे, सयाजी वांढेकर,प्रशांत वांढेकर, डॉक्टर मनोज शिंदे, सायली शिंदे पंचायत समिती सदस्य, हरिभाऊ लोळे जिल्हा परिषद सदस्य, सुनील दिघे, विजय क्षीरसागर ,सागर मोकाशी, गावातील युवक पिढी, महिला मंडळ, पदाधिकारी, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते. भिवडीचया माहेर वाशीनेकडून मदत गावच्या माहेरवाशीन कडून स्वत: निर्णय घेऊन, मंदिराच्या सुवर्णकलशासाठी गावच्या सहभागातून व माहेरवाशीण कडून मदत करण्यात आली असून, या माहेरवाशींनी डोक्यावर कलश घेऊन, मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. अशी माहिती सायली शिंदे पंचायत समिती सदस्य यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments