Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये गॅस दरवाढी विरोधामध्ये सासवड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे आंदोलन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील शिवतीर्थावर देशातील गॅस दरवाढ, महागाई आणि वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी दि. 16 रोजी निदर्शने करण्यात आली, यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली, सिलेंडरचे दर 900 रुपयांच्या पार गेल्याने, सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडलेले असून, व्यावसायिक सिलेंडरचे दरही 1900 रुपयावर पोहोचल्याचे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे, याशिवाय राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरही टीका करण्यात आली असून, शेतकऱ्यांची 7/12 कोरे करण्याचे आश्वासन सरकारने पाळलेले नाही, अशी टीका यावेळी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची मर्यादा तीन वरून पाच लाखापर्यंत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली, असून विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे, सरकारकडून गॅस सिलेंडरची टंचाई नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकास व्यावसायिकांना सिलेंडर उपलब्ध होत नाही, सिलेंडरचे वितरण सुरळीत करावे अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे,) या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे, सुनील असवलीकर, साहेबराव फडतरे, राजेंद्र बरकडे ,सचिन दुर्गाडे, सविता बरकडे, संदीप जगताप, बापू मोकाशी, माऊली बोराडे ,भाऊसाहेब फडतरे आदी उपस्थित होते. तालुक्यात प्रत्येक आठवडे बाजाराच्या दिवशी हे आंदोलन सुरूच राहील, अशी सुद्धा साहेबराव फडतरे यांनी स्पष्ट केले आहे, पुढील आंदोलनासाठी परिंचे, वीर ,निरा येथे सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments