Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे यंत्रामध्ये अडकून महिलेचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शेतामधील ज्वारी भरडण्याचे काम सुरू असताना, यंत्राच्या शापमध्ये केस अडकल्याने, एका 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, या घटनेमध्ये त्यांचे शीर धडावेगळे झाले, ही भीषण घटना सोमवारी दि. 16 रोजी माळशिरस तालुका पुरंदर येथे घडली. मंगल तुकाराम कुंभारकर वय 64 राहणार वनपुरी असे मृत महिलेचे नाव आहे, मिळालेल्या माहितीनुसार कुंभारकर कुटुंब मूळचे वनपुरी येथील असले तरी ,माळशिरस येथे त्यांच्या माहेरी त्यांच्या शेती आहे ,आज मुलगा विकाससह त्या शेतात ज्वारी भरडण्याचे काम करत होत्या ,ट्रॅक्टर आणि यंत्राला जोडणाऱ्या शापजवळ पडलेली कणसे गोळा करत असताना, अचानक मंगल यांचे केशाफ्ट मध्ये केस अडकले यंत्राचा वेग जास्त असल्याने, क्षणात त्यांना आत ओढले, गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे, जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन, पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments