Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त 171 रक्तदात्याने केले रक्तदान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: रविवार,15 मार्च रोजी कऱ्हामाई मंदिरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास 171 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक संदीप आप्पा भोंडवे, गुप्त विभाग पोलीस अधिकारी रुपेश भगत, ह. भ. प स्वप्नील महाराज काळाने, आदींनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी महिला वर्गाचा मोठा सहभाग होता तसेच पुरंदर तालुक्यातील विविध खेडेगावातून सुद्धा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाचे धारकरी मंडळी आले होते. सुपे, पानवडी, कुंभोशी, झेंडेवाडी, पवारवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, आंबोडी धालेवाडी, शिवरी या भागातून भरपूर धारकर रक्तदान करण्यासाठी आले होते.प्रत्येक रक्तदात्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा व पुरंदरचे धुरंदर शिवाजी एक्के लिखित किल्ले पुरंदर व परिसर हा ग्रंथ भेट देण्यात आला.रक्तदान शिबिरास सासवडचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक राजन (भैया) जगताप, मयूर चौखंडे व यांनी रक्तदात्यांस येऊन व रक्तदान शिबिराच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाचे धारकरी अमित पवार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments