Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे नागरिकांना शासकीय सेवेचा लाभ तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव महसूल समाधान शिबिरास चांगला प्रतिसाद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : शिवरी ता. पुरंदर येथे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व जलद गतीने उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने, महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर शनिवार या दिवशी दि. 14 रोजी पार पडले. या वेळी विविध विभागाच्या सहभागातून नागरिकांना अनेक शासकीय सेवा व दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हे शिबिर राबविण्यात येत असून, या शिबिरासाठी आमदार विजय शिवतारे ,तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, सहाय्यक निबंधक रवींद्र फुलपगारे, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, सभापती पुरंदर पंचायत समिती अमित झेंडे, उपसभापती पुरंदर पंचायत समिती प्रवीण जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, हरिभाऊ लोळे, डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर, स्मिता निगडे, मोनिका कांबळे इत्यादी मान्यवर आधी उपस्थित होते. तसेच संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सुद्धा उपस्थित होते, ग्राम महसूल अधिकारी, आधार केंद्र चालक, सीएमसी व महा-ई-सेवा केंद्र चालक, गॅस पुरवठादार आधी उपस्थित यावेळी होते,या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाल्याने, ग्रामस्थांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केले असून, तसेच अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हाने, आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे, यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत ,निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी विविध शासकीय योजना या सेवा विषयी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकामध्ये तहसीलदार विक्रम राजपूत यांनी अशी माहिती दिली की, प्रलंबित फेरफार 57, सातबारा दुरुस्ती प्रकरणे 29, जीवन सात बारा 127, डिजिटल सातबारा देणे 946, आठ वितरण करणे 355, तुकडे बंदी नियमतीकरण करणे 7, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक प्रकरणे 2, भूसंपादन कमी जास्त पत्रक तयार 3, आकर्षित कमी जास्त पत्र तयार 0, अ कृषीक तरतुदीचा सुधारणाानुसार आधी मूल्य वसूल करणे 0, लोकसेवा हक्क कायदा.1) जात प्रमाणपत्र 27, 2) नॉन क्रिमीलेअर 15, 3) उत्पन्नाचा दाखला 47, 4) रहिवासी अधिवास प्रमाणपत्र 12, सामाजिक लाभाच्या योजना 1) संजय गांधी 69, 2) इंदिरा गांधी योजना 0,1) खिडकी योजना 1,2) ई मोजणी 3, 3) आयर गोष्टीक 186, 4) पीएम किसान 27,5) तक्रार निवारण 10.अशी तहसीलदार यांनी विस्तृतपणे माहिती दिली. आभार प्रदर्शन तलाठी प्रमोद झुरंगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments