Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथे उपवास सोडण्यासाठी आलेल्या युवकावर हल्ला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : आस्करवाडी तालुका पुरंदर येथील आमराई परिसरामधील तलावाजवळ उपवास सोडण्यासाठी बसलेल्या तरुणांना टोळक्याने मारहाण करण्यात आलेची घटना शुक्रवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी घडली असून, शिवीगाळ करत लाठ्या ,काठ्याचा बुखयाचा आणि कोयत्याने मारहाण केलेली आहे, हल्ल्यामध्ये काही प्रमाणामध्ये तरुण जखमी झाले असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत कोंढवा येथील रहिवाशी फिरोज जावेद सय्यद वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते आपल्या मित्रासह आसकरवाडी येथील तलावाजवळ उपवास सोडण्यासाठी बसले होते, यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून आलेल्या सुमारे 100 ते 150 अज्ञात व्यक्तींनी कोणतीही चितावणी नसताना, त्यांना घेरले, टोळक्याने जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, वादाचे रूपांतर भांडणात होऊन, जमावाणे दांडके, चाबूक व कोयत्याने फिर्यादी व त्यांच्या तीन मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, फिरोज सय्यद यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या नंबर वरून संशयाचा शोध घेतला जात आहे, चौकशीसाठी काही लोकांना ताब्यात घेतले असून ,दरम्यान मारहाण करणाऱ्या वर कारवाईच्या मागणीसाठी कों ढव्यातील 40 ते 50 नागरिकांनी तसेच काही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरा जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले होते, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली होती, पोलीस प्रशासन सखोल तपास करीत आहे, तांत्रिक पुराव्याच्या साह्याने आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू असून, दोषींना सोडले जाणार नाही, नागरिकांनी कोणत्याही आफवावर विश्वास ठेवू नये, आणि जातीय तेढ निर्माण होईल, असे असे कृत्य करून हया परिसरामध्ये शांतता राखली पाहिजे .कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.

Post a Comment

0 Comments