पुरंदर तालुक्यातील सासवड येथे विविध खेळांच्या स्पर्धा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टच्या अर्जुन पार्कमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, अर्जुन गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी या स्पर्धा घेण्यात येतात, यामध्ये सिंधुताई अंबिके व सुहासिनी आटलेकर यांनी विविध गाणे मार्फत कवायतीचे प्रकार, देशभक्तीपर गीते सादर करत आनंदायी शिक्षण देण्यात आले, विद्यार्थ्यांनी खेळास, रांगोळी, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन नृत्य, भाषण यासारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत बक्षिसे जिंकली, या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथेवाडी , म.य.सो इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कन्या प्रशाला आदी शाळांनी सहभाग घेतला होता, आयडीबीआय बँकेचे अक्षय कदम हे प्रमुख अतिथी होते, मुख्याध्यापक प्रकाश जगताप, कस्तुरबा ट्रस्टच्या प्रतिनिधी शेवंता चव्हाण उपस्थित होते, मीनल जाधव, ललिता कुंजीर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार झुरंगे यांनी केले ,तर प्रेरणा देशमुख यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments