Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड नगरपरिषदेची कर वसुली मोहीम तीव्र; थकबाकीदारांच्या मालमत्तेवर करण्यात आली जप्तीची कारवाई​ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरी सुविधा अखंडित ठेवण्यासाठी, सासवड नगरपरिषदेने घरपट्टी (मालमत्ता कर) आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या विशेष वसुली पथकामार्फत शनिवार दिनांक 14 मार्च रोजी सोपननगर हाडको भागातील 8 थकीत मिळकतधारकांवर नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात आली.तसेच म्हाडा सोसायटी, आंबोडी रोड येथील 14 सदनिकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊन देखील कराचा भरणा न करणाऱ्या थकित मिळकतधारकांवर नळ कनेक्शन कापणे व मालमत्तेवर जप्तीची कारवाई करणे यासारख्या कारवाया अधिक तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सासवड नगर परिषद प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.थकबाकी वसुलीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या नागरिकांनी अद्याप आपला चालू वर्षाचा कर आणि मागील थकबाकी भरलेली नाही, त्यांनी ती त्वरित भरावी.थकित मिळकत धारकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.​"सासवडकर नागरिकांनी थकित व चालू मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा विहित मुदतीत करून नगरपरिषदेस सहकार्य करावे.तसेच शासनाच्या अभय योजनेचा थकित मिळकत धारकांनी अवश्य लाभ घ्यावा ही सुवर्णसंधी कोणी चुकवू नये." असे आवाहन सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी केले.​सुटीच्या दिवशीही सुविधा: नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेचे कर संकलन केंद्र शनिवार आणि रविवारी देखील सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे.​ऑनलाईन पेमेंट: नागरिक घरबसल्या नगरपरिषदेच्या saswadnagarparishad.org या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे 'डिजीटल पेमेंट' करू शकतात.

Post a Comment

0 Comments